Thursday , March 5 2026
Breaking News

बेळगावात श्रीराम सेना हिंदुस्थानची कार्यतत्परता!

Spread the love

 

बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यतत्परतेने आज बेळगावमध्ये एक लव्ह जिहादसारखा प्रकार उघडकीस आला.
बेळगावमध्ये ‘श्रद्धा’ची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी खबरदारी घेत महिलावर्गाला आवाहन केले आहे.
बेळगावमध्ये निदर्शनात आलेल्या घटनेनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर तरुणींना आणि महिलावर्गाला आवाहन करत स्वतःची सुरक्षितता जपण्याचा सल्ला दिला आहे. बेळगावमधील शाळा क्रमांक ५ येथे हा प्रकार उघडकीस आला असून जम्मू काश्मीरमधील एक तरुण बेळगावमधील लिंगायत समाजातील एका तरुणीला दररोज फूस लावून आपल्या दुचाकीवरून घेऊन जात असल्याचे निदर्शनात आले.
कॅम्प परिसरात कामानिमित्त जाणाऱ्या तरुणीला दररोज दुचाकीवरून ने-आण करणाऱ्या या तरुणाचा हेतू योग्य वाटला नसल्याने सदर बाब मार्केट पोलीस स्थानकाच्याही निदर्शनात आणून देण्यात आली.
यावेळी रमाकांत कोंडुसकर यांनी तमाम महिलावर्गाला एक आवाहन केले असून, सर्व तरुणी, शालेय विद्यार्थिनी आणि महिलावर्गाने स्वतःच्या सुरक्षेसाठी सक्षम असावे, कोणत्याही आमिषाला बळी न पडता, आपल्या पालकांचा विचार करून योग्य निर्णय घ्यावेत.
आपल्या समाजात आपली प्रतिष्ठापणाला लागणार नाही याची काळजी घ्यावी, आणि दिल्लीत झालेल्या श्रद्धा हत्याकांडावरून बोध घेऊन आपण कसे वागावे हेदेखील ठरवावे आणि खबरदारी बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *