सौंदत्ती : कौटुंबिक त्रासाला कंटाळून एका महिलेने आपल्या दोन मुलांसह नवलतीर्थ जलाशयात उडी घेऊन आत्महत्या केली.
सौंदत्ती पोलिस स्थानकाच्या वतनाळ गावानजीक नवलतीर्थ जलाशयात तीन मृतदेह आढळून आले.
शशिकला उर्फ तनुजा परसप्पा गोडी (वय 32 रा. चुंचनूर, ता.रामदुर्ग) या महिलेने मुलगा सुदीप (वय ४ वर्षे) आणि मुलगी राधिका (वय 3 वर्षे) यांच्यासह नवलतीर्थ जलाशयात उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अग्निशमन दलाच्या मदतीने तीनही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. या प्रकरणाची सौंदत्ती पोलीस स्थानकात नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी दिली.