बेळगाव : मी कदापि निधर्मी जनता दलात जाणार नाही असे सांगत रमेश जारकीहोळी यांनी पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
रमेश जारकीहोळी निजदमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय व्यासपीठावर होती. मात्र आज त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना, आपण भाजपशी एकनिष्ठ आहोत. कदाचित लवकरच भाजप आपल्याला एखादी महत्त्वाची जबाबदारीही सोपवेल, असा विश्वास व्यक्त करीत आपण निधर्मी जनता दलात कदापि जाणार नसल्याचे ठासून सांगितले.
देवेगौडा यांच्याशी आपले अनेक वर्षांपासूनचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्याशी गाठीभेटी घेणे म्हणजे पक्षांतराच्या वाटेवर नव्हे, असे रमेश जारकीहोळी म्हणाले.
काँग्रेस पक्षाच्या भवितव्याबद्दल विचारताना त्यांनी, राज्यातील काँग्रेसचे नेतेच काँग्रेस पक्षाला संपुष्टात आणतील असे म्हटले.
Belgaum Varta Belgaum Varta