Sunday , July 26 2026
Breaking News

पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयात ग्रंथालयाचे चौकट पूजन

Spread the love

 

बेळगाव : जीवनात ध्येय ठेवून वाटचाल कराल तर यशाची शिखरे नक्कीच लांब नाहीत. यश तुमच्या हातात आहे कष्ट करण्याची जिद्द, चिकाटी तुमच्यात हवी आहे. मी या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असून या महाविद्यालयाने पुष्कळ काही मला दिले आहे ते कदापी विसरु शकत नाही. नोकरी करून स्वतःत गूरपडून घेण्यापेक्षा होतकरू विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस चालू केले. तसेच सामाजिक कार्याला वाहून घेतले. बरेचसे विद्यार्थी शासनाच्या वेगवेगळ्या खात्यामध्ये अधिकारी म्हणून काम करत आहेत आपण सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा असेच उत्तम भरारी घ्यावी. असे उद्गार राज्य हस्तकला व ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष मारुती अष्टगी यांनी पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयामध्ये डिजिटल लायब्ररीचे चौकट पूजन प्रसंगी आयोजित समारंभात व्यक्त केले.
प्रारंभी वार्ड नं 29 चे नगरसेवक नितीन जाधव यांनी चौकटीचे पूजन करून मालार्पण केले. समवेत राज्य ओबीसी मोर्चाचे सेक्रेटरी किरण जाधव यांनी श्रीफळ वाढविला. व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते अरूण कुरणकर, दै. वार्ताचे संपादक सुहास हुद्दार, विश्वभारत सेवा समितीचे उपाध्यक्ष नेताजीराव कटांबळे, सचिव प्रकाश नंदिहळी, प्राचार्या ममता पवार, विमल मुचंडी, विमल कंग्राळकर, परशुराम गोरल, एस. एम. साखळकर, गजानन घुग्रेटकर, विश्वनाथ वांगेकर इ. तसेच शिक्षक वृंद व विद्यार्थ्यी उपस्थित होते. सूत्रसंचालन मयूर नागेनहट्टी तर आभार प्रदर्शन प्रा. के. एल. शिंदे यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *