बेळगाव (प्रतिनिधी) : पदवीपूर्व महाविद्यालयीन राज्यस्तरीय सिलंबम्ब स्पर्धेसाठी निवड झालेले बेळगावचे सिलंबम्बपटू आज रविवारी सकाळी कोप्पळकडे रवाना झाले आहेत.
जिल्हास्तरीय स्पर्धेत विशेष चमक दाखविल्यानंतर आता हे विजेते सिलंबम्बपटू राज्यस्तरावर आपल्या खेळाचे कौशल्य दाखविण्यासाठी कोप्पळकडे रवाना झाले.
पदवी पूर्व शिक्षण खात्याचे उपसंचालक व्ही. नागराज यांनी या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
कोप्पळ जिल्ह्यातील कुष्ठगी तालुक्यातील हनुमसागर सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयात दिनांक सोमवार दिनांक 21 व मंगळवार दिनांक 22 नोव्हेंबर अशा दोन दिवस या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.
लक्ष्मी अशोक सांबरेकर, तृप्ती राजू गोरल, अपर्णा भरणा मोटरे, श्रुती श्रीकांत जोमाने, सुमित पुंडलिक बिर्जे, कृष्णा बी. धामणेकर, सिद्धार्थ व्ही. ताशीलदार, सक्षम आर. जाधव, रोहित एच. पाटील अशी राज्यस्तरीय सिलंबम्ब स्पर्धेकरिता कोप्पळला रवाना झालेल्या सिलंबम्बपटूंची नावे आहेत.
हे सिलंबम्बपटू बेळगाव जिल्हा अम्याचुअर सिलंबम्ब असोसिएशनचे सचिव आणि सिलंबम्ब प्रशिक्षक लक्ष्मण वाय. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सिलंबम्ब खेळाचा सराव करतात.
Belgaum Varta Belgaum Varta