
बेळगाव : रामदेव गल्ली, कंग्राळी खुर्द येथे दि. 20 नोव्हेंबर 2022 पासून श्री गणेश चषक-2022 भव्य डे नाईट हाफपिच क्रिकेट स्पर्धेला मोठ्या थाटात प्रारंभ झाला.
स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र एकिकरण समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले, श्रीरामसेना हिंदुस्तान अध्यक्ष रमाकांत दादा कोंडुसकर, मार्कंडे साखर कारखाना संचालक आर. आय. पाटील, आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष चेतन पाटील, ग्रामपंचायत सदस्य युवकांचे आधारस्तंभ परशुराम पाटील, धनंजय तुळसकर, राकेश गोंदवाडकर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta