Tuesday , September 17 2024
Breaking News

दसरा आणि दिवाळी निमित्ताने स्पेशल रेल्वेची बेळगाव सिटीझन फोरमतर्फे मागणी

Spread the love

बेळगाव : बेळगाव सिटीझन फोरमतर्फे आज अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव रेल्वे स्टेशनचे नवनियुक्त स्टेशन व्यवस्थापक पी. नागराज यांची भेट घेण्यात आली. त्यांच्याकडे दसरा आणि दिवाळी सणांच्या निमित्ताने स्पेशल रेल्वे सेवांची मागणी करण्यात आली आहे.
त्यांच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालय आणि जीएम एसडब्ल्यूआर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. दसरा आणि दिवाळी दरम्यान हॉलिडे स्पेशल ट्रेन हुबळी विभागाने सुरू करावी अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
प्रारंभी पी. नागराज यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. नूतन स्टेशन व्यवस्थापक म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. क्लोन ट्रेन सुरू करण्याची मागणीही प्रतिनिधींनी केली.
पी. नागराज यांनी कौन्सिलला आश्वासन दिले की ते आपल्या पदाचा वापर समस्या सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील.
परिषदेने केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. सार्वजनिक वाहतूक समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी डी. अनिलकुमार, शेवंतीलाल शहा, श्री. एस. सुरेश माजी एसएमआर बीजीएम, अरुण कुलकर्णी, विकास कलघटगी आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *