बेळगाव : 23 नोव्हेंबर रोजी होणारी सीमाप्रश्नी सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. उद्याच्या सुप्रीम कोर्टाच्या कामकाजात सीमाप्रश्नी खटल्याचा समावेश होणार नाही.
संपूर्ण सीमावासीयांचे लक्ष उद्या होणाऱ्या निकालाकडे होते. अनेक समितीप्रेमी हा निकाल “याची देही याची डोळा” पाहता, ऐकता यावा म्हणून दिल्लीला रवाना झाले आहेत. मात्र सुप्रीम कोर्टात या खटल्यावर सुनावणीच होणार नसल्यामुळे सीमाभागात नाराजी पसरली आहे. सीमाप्रश्नी खटल्याची पुढील तारीख देखील निश्चित नसल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते.
Belgaum Varta Belgaum Varta