बेळगाव : हिंडलगा पंचायतीने कचरा फेकणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
बेळगाव तालुक्यातील हिंडलगा ग्रामपंचायतीच्या व्याप्तीत नागरिक सर्वत्र कचरा टाकत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अभिनव उपाय योजिला आहे.
मंगळवारी ग्रा.पं.चे अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी सीसी कॅमेरे बसवण्याच्या कामाला सुरुवात केली. तसेच ग्रामपंचायतीने कचरा टाकणाऱ्यांना पाच हजार रुपये दंड आकारण्याचा इशारा दिला आहे. यावेळी ग्रा. पं. उपाध्यक्षा भाग्यश्री कोकितकर, रामचंद्र मन्नोळकर, मिथुन उसूलकर, आरती कडोलकर, पांडुरंग, गावडे, शिवाजी चौघुले, संगिता, संभाजी चौघुले, कुमार उसूलकर, संतोष पिल्ले, परशुराम सुरेलकर, सुरेंद्र अनगोळकर, आदी उपस्थित इतर पुढे आले.
Belgaum Varta Belgaum Varta