
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने येत्या 28 नोव्हेंबर रोजी रिंग रोड विरोधात पुकारलेल्या चाबूक मोर्चा संदर्भात बिजगर्णी, बेळगुंदी येथे काल दि. 22 रोजी जनजागृती करण्यात आली. बैठकीत कल्लाप्पा भास्कर सर यांनी बहुसंख्येने शेतकरी मोर्चाला सहभागी होतील, अशी ग्वाही दिली.
यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, युवा नेते आर. एम. चौगुले, माजी महापौर शिवाजी सुंठकर, ऍड. सुधीर चव्हाण, आर. आय. पाटील, मनोज पावशे, आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष चेतन पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजू किणेकर, युवा आघाडी अध्यक्ष बेळगुंदी रामा आमरोळकर, किरण मोटकर, मारुती शिंदे, महेश पावसकर, किरण गावडे, अरुण जाधव तसेच
दामू मोरे, श्रीरंग भास्कर, वसंत अष्टेकर, प्रकाश भास्कर सर, विष्णू मोरे, नारायण चौगुले, सुब्राव नाईक, बबन कांबळे, राजू कांबळे, रजनीकांत अष्टेकर, संदीप अष्टेकर (ग्रामपंचायत सदस्य), अशोक बिरजे (माजी ग्राम पंचायत सदस्य), नारायण भास्कर, कल्लाप्पा हालकर्णीकर, परसराम सुतार, अनिल हलकर्णीकर, बाबू भास्कर, जक्काप्पा मोरे, रामचंद्र कोळी, चिमाजी अष्टेकर, मारुती अष्टेकर आदी शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta