बेळगाव : उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठा फिटनेस क्लब असलेल्या वेणूग्राम सायकलिंग क्लब बेळगावचा 5 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
बेळगावच्या वेणुग्राम सायकलिंग क्लबतर्फे आठवडाभर गटागटाने सायकलिंग, धावणे आणि जलतरणाचे उपक्रम राबविले जातात. ग्रुपच्या नुकत्याच साजरा झालेल्या पाचव्या वर्धापन दिन समारंभास 183 नोंदणीकृत सदस्यांपैकी सुमारे 135 जण हजर होते. यावेळी यंदाच्या 2022 या वर्षात विविध स्पर्धा उपक्रम आणि मोहिमांमध्ये सुयश मिळवलेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये अलीकडेच गोव्यामधील 70.3 आयर्न मॅन शर्यत यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या बेळगावच्या 6 ट्रायथलिट्स पैकी वेणूग्राम सायकलिंग क्लबच्या तिघांचा समावेश होता. त्याचप्रमाणे वर्षभरात ट्रिपल एसआर, डबल एसआर आणि पहिल्यांदाच शर्यत पूर्ण करणारे अशा सुपर रँडोनर्सना गौरविण्यात आले. या खेरीज मॅरेथॉन आणि इतर स्पर्धांमध्ये विविध पुरस्कार मिळवणाऱ्या सदस्यांना देखील वेणूग्राम सायकलिंग क्लबतर्फे सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी क्लबच्या सदस्यांसह निमंत्रित मंडळी बहुसंख्येने उपस्थित होती.
Belgaum Varta Belgaum Varta