बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवार दि 28 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित केलेल्या मोर्चाला मध्यवर्ती म. ए. समितीने पाठिंबा व्यक्त केला आहे. रिंगरोडच्या नावाखाली 32 गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांना देशोधडीला लावण्याचे काम सरकार करीत आहे. या जमिनी वाचविण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने मोर्चात सहभागी होणे आहे. बेळगाव शहर, तालुक्यातील सर्व शेतकरी, नागरिक, महिला, युवक मंडळे यांनी दिनांक 28 रोजी तालुका म. ए. समितीने आयोजित केलेल्या मोर्चाला पाठिंबा देऊन सहभागी व्हावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. दीपक दळवी, कार्याध्यक्ष श्री. मनोहर किणेकर, सरचिटणीस श्री. मालोजी अष्टेकर, खजिनदार श्री. प्रकाश मरगाळे, चिटणीस रणजित चव्हाण-पाटील व पदाधिकारी यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta