बेळगाव : महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई व चंद्रकांत पाटील 3 डिसेंबर रोजी बेळगांव दौऱ्यावर येणार आहेत. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नी मध्यवर्तीच्या नेत्यांशी व कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात महत्वाच्या टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर सीमाभागातील जनतेशी चर्चा करून त्यांच्या भावना महाराष्ट्राने जाणून घ्याव्यात अशी माध्यवर्तीची भूमिका आहे. त्या अनुषंगाने चंद्रकांत पाटील व शंभूराजे देसाई 3 डिसेंबरला बेळगांव दौऱ्यावर येणार आहेत. चर्चेतून नक्कीच मार्ग निघतो, असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच न्यायालयात आहे निर्णायक वळणावर आलेल्या सीमाप्रश्नी दोन्ही राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने नियुक्ती केलेल्या समन्वयक मंत्र्यांनी सीमाभागात भेट देऊन सीमावासीयांशी संवाद साधून त्यांच्या भावना समजून घ्याव्यात, अशी मागणी मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी, खजिनदार प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केली होती.
Belgaum Varta Belgaum Varta