नवी दिल्ली : बुधवार दिनांक 23 रोजी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार होती. सदर सुनावणी न्यायाधीश अन्य खंडपीठाच्या कामात व्यस्त असल्यामुळे महत्त्वपूर्ण सुनावणी लांबणीवर पडली. त्यानंतर उद्या 30 नोव्हेंबर रोजी होणारी सुनावणी ही न्यायाधीश रजेवर असल्यामुळे लांबणीवर पडली आहे.
उद्याच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज मंगळवारीच दिल्लीत पोहोचले आहेत. दिल्लीतील वास्तव्यादरम्यान मुख्यमंत्री बोम्मई सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व अन्य बड्या नेत्यांच्या भेटी घेणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta