ग्रामीण भागातील मुलांनाही मिळाले डिजिटल वाचनालय…
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बेनकनहळ्ळी येथे लहान मुलांसाठी उभारण्यात आलेल्या डिजिटल लायब्ररीचे आज बुधवारी आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनानंतर बोलताना आ. लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, ज्यांनी समाजातील अन्यायकारक प्रथांविरोधात लढा देत पतीच्या मदतीने स्त्री शिक्षणाचा पाया रोवला आणि अक्षरक्रांतीला सुरुवात करून महिलांना घडविले, अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक डिजिटल लायब्ररीचा मुलांनी (विद्यार्थ्यांनी) लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी गावातील गरोदर महिलांना पौष्टिक आहाराचे वाटप करून माता व शिशुच्या आरोग्याची काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी केली.
याप्रसंगी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी राजेश धनवाडकर, मोहन सांबरेकर, बाळू देसुरकर, महेश कोलकार, सीडीपीओ चंद्रशेखर सुखसारे, पीडिओ सुजाता बट्टकुर्की, ग्रा. पं. अध्यक्षा प्रेमा हिरोजी, उपाध्यक्षा अंजना नाईक, रमेश गावडे, डॉ. मोहन गरग, सचिन जाधव गणेश सुतार, दिनेश लोहार, मीनाक्षी पाटील, मंजुळा नाईक, लक्ष्मी शिंदे, कलावती देसुरकर, अनुराधा वाघमोरे, शीला सांबरेकर, अश्विनी लोहार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta