बेळगाव : शहरातील केएलई सोसायटीच्या आर. एल. सायन्स कॉलेजच्या बास्केटबॉल संघाने नुकत्याच झालेल्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेचे उपविजेतेपद मिळविले आहे.
अथणी येथील केएलई सोसायटीच्या एसएमएस कॉलेजने यंदाच्या या आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. आर. एल. सायन्स कॉलेजच्या बास्केटबॉल संघाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली, परंतु या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. तथापी आंतर महाविद्यालयीन पातळीवरील स्पर्धेत उपविजेतेपद मिळवल्याबद्दल कॉलेज व्यवस्थापन मंडळाचे विजय पाटील, प्राचार्या श्रीमती जे. एस. कवळेकर, पदवीपूर्व प्राचार्य विश्वनाथ कामगोळ, शारीरिक संचालक डॉ. शिवानंद बुलबुली, जिमखाना उपाध्यक्ष पुरुषोत्तम आदींनी यशस्वी बास्केटबॉलपटूंचे अभिनंदन केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta