बेळगाव : पी. डी. भरतेश कॉलेज ऑफ नर्सिंग, हलगा, या महाविद्यालयाचा M.Sc (N) च्या 10 व्या बॅचच्या B.Sc (N) च्या 19 व्या बॅचचा आणि GNM नर्सिंगच्या 4व्या २०२२-२३ बॅचचा नूतन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आणि B.Sc (N),M.Sc (N) आणि GNM च्या निर्गमित विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अलीकडे पार पडला.
या कार्यक्रमाची सुरुवात M.Sc आणि GNM. विद्यार्थ्यांच्या आमंत्रण गीताने झाली, त्यानंतर प्राचार्या प्रा. डॉ. संगीता ए. मोरेश्वर, यांचे स्वागत भाषण झाले. प्रमुख पाहुणे विजय मोरे माजी महापौर आणि सामाजिक कार्यकर्ते बेळगाव यांनी नर्सिंगचा प्रभावी सराव करण्यासाठी मूलभूत नर्सिंग कौशल्ये शिकणे आणि आत्मसात करणे याबद्दल माहिती दिली आणि नर्सिंगची सध्याची व्याप्ती, त्याच्या भविष्यातील संभावनांवर प्रकाश टाकला. गरजूंना शक्य तितक्या चांगल्या नर्सिंग सेवा पुरवण्यासाठी पुरेसे ज्ञान आणि कौशल्ये विकसित करण्यासाठी विजय मोरे यांनी प्रोत्साहन दिले.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ, डेक्कन मेडिकल सेंटर आणि पी. डी. भरतेश कॉलेज ऑफ नर्सिंग गव्हर्निंग चेअरपर्सन डॉ. सावित्री आर. दोड्डणावर यांनी व्यवस्थापन समितीच्या वतीने नूतन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि या संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि शिक्षणाच्या दर्जाविषयी माहिती दिली. डॉ.सावित्री आर. दोड्डणावर यांनी निर्गमित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि दैनंदिन व्यवहारात नैतिक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या दृष्टीने हॉस्पिटलमधील परिचारिकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले.
महाविद्यालयाच्या उप-प्राचार्य, प्रा. महेश एम रेबिनल यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta