बेळगाव : डिजिटल सुरक्षा प्रणालीचा प्रभावी वापर करून धार्मिक सार्वजनिक व्यवस्था गटांमध्ये सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला विशेष पुरस्काराने नवी दिल्लीत गौरविण्यात आला त्यानिमित बेळगावात देखील त्यांचा सत्कार करण्यात आला.
दिल्लीच्या परतीच्या प्रवासा वेळी देवस्थानाचे सचिव शिवराज नाईकवाडी दिल्ली बेळगाव विमान प्रवासादरम्यान बेळगाव विमानतळावर बेळगावकर यांनी भेट देऊन श्री ज्योतिर्लिंग भक्त मंडळ बेळगाव यांच्या वतीने प्राचार्य आनंद आपटेकर यांनी फुल गुच्छ दिले तर श्री ज्योतिर्लिंग देव दादा सासनकाठी चव्हाट गल्ली बेळगाव यांच्या वतीने फेटा आणि शाल देऊन लक्ष्मण पिराजी किल्लेकर (पुजारी), सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने अध्यक्ष सुनील जाधव यांनी श्रीफळ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी जयवंत काकक्तीकर, गिरीश पाटील, सुरेश तारियाळ, गणेश जाधव, दौलत कावळे उपस्थित होते.
नवी दिल्लीत कार्यक्रमाचे संयोजक आशिष ढक्कन, गगन लांबा, नरसिम्हा, विनय मिश्रा यांच्या हस्ते देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, उपअभियंता सुयश पाटील व सीसीटीव्ही कक्षाचे राहुल जगताप यांच्याकडे पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
Belgaum Varta Belgaum Varta