बेळगाव : महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती असल्याने कर्नाटक-महाराष्ट्र राज्यांमधील बस वाहतूक आज ठप्प झाली आहे.
महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या बेळगाव भेटीमुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमधील सीमावाद चव्हाट्यावर आला असून सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती असून खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही राज्यांमधील बस वाहतूक बंद करण्यात आली आहे. चिक्कोडी आगार नियंत्रक शशिधर यांनी माहिती दिली की परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत महाराष्ट्रातील बस वाहतूक बंद करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta