नवी दिल्ली : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुरुवारी महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय खासदारांशी चर्चा करणार आहेत.
महाराष्ट्राच्या खासदारांच्या विनंतीला सहमती दर्शवत अमित शहा यांनी गुरुवारी दुपारी 12.40 वाजता चर्चेसाठी वेळ दिला आहे.
बुधवारी, संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे यांच्यासह महाराष्ट्रातील काही खासदारांनी सीमावादाचा मुद्दा उपस्थित करत कर्नाटकवर ताशेरे ओढले. त्यावर कर्नाटकचे खासदार शिवकुमार उदासी यांनी उत्तर दिले. यानंतर महाराष्ट्राच्या खासदारांनी अमित शहांकडे चर्चेसाठी वेळ मागितला आहे. अमित शहा यांनी गुरुवारीच वेळ दिली आहे.
कर्नाटकच्या सर्व खासदारांनी संघटित होऊन तातडीने केंद्रीय गृहमंत्र्यांची वेळ मागून घ्यावी. सीमावादाचा अभ्यास करून या समस्येकडे पुरेशा प्रमाणात लक्ष देण्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या दिरंगाईबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांना स्पष्टीकरण देण्याची गरज आहे.
Belgaum Varta Belgaum Varta