बेळगाव : कर्नाटक सरकारला मराठी भाषकांची ताकद दाखवून देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 19 डिसेंबरला महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी कर्नाटक सरकारतर्फे बेळगावात होणाऱ्या अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी महामेळाव्याचे आयोजन केले जाते. महामेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे.
अधिवेशन काळात होणाऱ्या महामेळाव्याबाबत मध्यवर्ती महाराष्ट्र समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आहे. यावेळी समिती नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत महामेळावा घेतला जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाला दिली आहे. मध्यवर्ती समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी महापौर मालोजी अष्टेकर, विकास कलघटगी, रणजीत चव्हाण पाटील यांनी एसीपी चंद्रप्पा व इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta