Thursday , March 5 2026
Breaking News

‘सर्वोत्कृष्ट व्यापारी’ पुरस्काराने पोतदार ज्वेलर्स सन्मानित

Spread the love

 

हैदराबाद -कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्यावतीने बेळगावच्या पोतदार ज्वेलर्सला बेळगाव जिल्ह्यातील सर्वोत्तम व्यापारी पेढी म्हणून ‘सर्वोत्कृष्ट व्यापारी’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

गुलबर्गा येथील पीडीए इंजीनियरिंग कॉलेजच्या सभागृहामध्ये गेल्या शनिवारी व काल रविवारी व्यापारी व उद्योजकांची परिषद पार पडली. हैदराबाद -कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने आयोजित केलेल्या या परिषदेचे औचित्य साधून पार पडलेल्या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पोतदार ज्वेलर्सच्यावतीने सर्वेश पोतदार यांनी ‘सर्वोत्कृष्ट व्यापारी’ हा पुरस्कार स्वीकारला. गुलबर्गा येथे झालेल्या परिषदेस उत्तर कर्नाटकातील आघाडीच्या व्यापारी व उद्योजकांचा सहभाग होता.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *