बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचे प्राथमिक व माध्यमिक मुलींचे फुटबॉल संघाने विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावित दुहेरी मुकुट संपादन केला तर मुलांच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
केदारपुर ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथील सरस्वती शिशु मंदिर शाळेच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या 33 व्या राष्ट्रीय विद्याभारती फुटबॉल स्पर्धेत दक्षिणमध्य क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करीत संत मीरा शाळेच्या प्राथमिक व माध्यमिक मुलींच्या फुटबॉल संघाने यश प्राप्त केले आहे.
प्राथमिक गटातील मुलींच्या अंतिम लढतीत संत मीरा शाळेने मानसा पब्लिक स्कूल पंजाब संघाचा 4-0 असा पराभव केला.विजयी संघाच्या दिपिंका रिंग 2 गोल, चैत्रा इम्मोजी व नताशा चंदगडकर हिने 1 गोल केला.
तर माध्यमिक मुलींच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा शाळेने उत्तर क्षेत्र संघाचा 5-0 असा पराभव केला विजयी संघाच्या समिक्षा चौगुलेने 2गोल तर रेनिवार मालशेय व प्रेरणा मालशोय यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
माध्यमिक मुलांच्या गटात पहिल्या सामन्यात संत मीरा शाळेने राजस्थानचा 7-0 असा पराभव केला विजयी संघाच्या स्वयम काकतकर रेहान नदाफ, प्रत्येकी 2 गोल, आदित्य सानी, विशाल जाधव, वैभव मरगाळे यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
दुसऱ्या सामन्यात संत मीरा शाळेने उत्तर क्षेत्र संघाचा 1-0 असा पराभव केला विजयी संघाच्या विशाल जाधवने 1गोल केला, उपांत्य सामन्यात संत मीरा शाळेने पूर्व उत्तर प्रदेश संघाचा 1-0 असा पराभव केला विजयी संघाच्या स्वयम् काकतकरने 1 गोल केला अंतिम लढतीत पश्चिम उत्तर प्रदेश संघाने संत मीरा शाळेचा पेनाल्टी शूटआउटवर 3-1 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
या स्पर्धेतील विजेत्या प्राथमिक मुलींच्या संघात राशी असलकर, अंजली चौगुले, केजोंती ब्रु, तलिरुंग रिंग, दीपिका रिंग, सान्वी पाटील, रितिका लोहार, चरण्या मंजुनाथ, चैत्रा इम्मोजी, आकांक्षा बोकमुरकर, नताशा चंदगडकर, श्रद्धा कोल्हापूरे, अवमृता मोळशोय, संजिता रिंग, मोनिता रिंग, सृष्टी बोंगाळे दीपा बिडी, ऐश्वर्या शहापूर,
माध्यमिक मुलांच्या गटात रेहान नदाफ, प्रणव खोराटे, आदित्य सानी, विशाल जाधव, स्वयंम ताशिलदार, मंथन बंडाचे, मृणाल शिंदे, देवेश मटकर, साई आपटेकर, वैभव मरगाळे, मंथन हलगेकर, आरिहंत पाटील, मुजकीर होसमनी, नागेश सावळगी, प्रणव देसाई, स्वयंम काकतकर, स्वरूप हलगेकर, गणेश पाटील, तर माध्यमिक मुलींच्या संघात संस्कृती भंडारी, संस्कृती खन्नुरकर, प्रेनारूनग मोलशिय, रेनिवर मोलशोय, सलामी अपेतो, चादोरुंग माश, ओरिना वॉरन, खोब्रस दलशकीमकिया, प्रीती भांदुर्गे, सृष्टी सावंत, भूमिका कुलकर्णी, स्वरा आंजनकर, झिया बाचीकर, कीर्ती मुरगोड, श्रद्धा ढवळे, प्रियांका पाटील, समीक्षा चौगुले, सृष्टी सचिन सावंत यांचा संघात समावेश असून या सर्व खेळाडूंना क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, नीरज सावंत, गौतम तेजम, चंद्रकांत तुर्केवाडी, ओमकार सावगांवकर, शिक्षिका धनश्री पाटील, विणाश्री तुक्कार यांचे मार्गदर्शन तर शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, शाळेचे अध्यक्ष व विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, जिल्हाध्यक्ष राघवेंद्र कुलकर्णी, जन कल्याण ट्रस्टचे, ट्रस्टी राघवेंद्र कागवाड, लक्ष्मण पवार, अशोक शिंत्रे व पालक वर्गाचे संघाला प्रोत्साहन लाभत आहे. आता विजेत्या मुलींच्या फुटबॉल संघाची आगामी होणार्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.