बेळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नातू, महाराष्ट्र कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र विधायक रोहित पवार यांनी दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी येळ्ळूर ग्रामपंचायतीला भेट दिली.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून रोहित पवार यांनी अभिवादन केले आणि त्यानंतर येळ्ळूर ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली. येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना रोहित पवार यांनी येळ्ळूर ग्रामपंचायतचे विशेष कौतुक केले. येळ्ळूर ग्रामपंचायतची पाहणी करून तेथील ग्रंथालय आणि इतर सुविधा पाहून रोहित पवार यांनी येळ्ळूर ग्रामपंचायत उत्कृष्ट ग्रामपंचायत असल्याचं मत व्यक्त केलं. त्याचबरोबर सतीश बा. पाटील यांनी रोहित पवार यांना ग्रामपंचायतीच्या कार्याची माहिती दिली.
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील, येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी, कार्याध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी, श्रीरामसेना अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील, रमेश मेनसे, राकेश परीट, माजी ग्रामपंचायत सदस्य राजू पावले, दलित संघटनेचे लक्ष्मण छत्रान्नावर, प्रमोद सूर्यवंशी, भीमराव पुण्यान्नवर, शशीकांत हुवाण्णावर, संदिप बा पाटील, बाळकृष्ण अ. पाटील आणि गावातील इतर नागरिक यावेळी उपस्थित होते.