येळ्ळूर : कर्नाटक सरकारला प्रत्युत्तर देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवार दि. 19 रोजी महामेळाव्याचे आयोजन केले आहे. सदर महामेळाव्याच्या जनजागृतीसाठी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने शनिवार दि. 17 डिसेंबर रोजी श्री चांगळेश्वरी मंदिरात सायं. 7 वा. बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी येळ्ळूर येथील आजी माजी जिल्हापरीषद सदस्य, तालुका पंचायत सदस्य, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आणि समितीनिष्ठ कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. शांताराम कुगजी व सेक्रेटरी श्री. प्रकाश अष्टेकर यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta