Sunday , September 8 2024
Breaking News

कुंचीमुळे श्वास गुदमरून अर्भकाचा मृत्यू

Spread the love

बेळगाव : डोक्याला घालण्याची कुंचीची दोरी गळ्याभोवती आवळली गेल्यामुळे अवघ्या सहा दिवसांच्या स्त्री जातीच्या एका अर्भकाचा श्वास गुदमरून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना नेहरूनगर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नुकतीच घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, हिंडलगा येथील ज्योती सागर जाधव (वय 21) या महिलेला बाळंतपणासाठी नेहरूनगर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिने गेल्या सोमवारी 4 ऑक्टोबर रोजी शस्त्रक्रियेद्वारे स्त्री जातीच्या अर्भकाला जन्म दिला होता.
सहा दिवसांच्या त्या अर्भकाला कुंची घालून झोपविण्यात येत होते. मात्र दुर्दैवाने कुंचीची दोरी गळ्याला आवळली गेल्याने त्या अर्भकाचा रविवारी गुदमरून मृत्यू झाला. त्यानंतर मातेसह मृत अर्भकाला घरी नेण्यात आले.
दरम्यान, एपीएमसी पोलिसांना काल सोमवारी या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ अधिक तपास करीत आहेत. अवघ्या सहा दिवसांच्या अजान अर्भकाला कुंचीमुळे जीव गमवावा लागल्यामुळे संबंधित हॉस्पिटलसह सुळगा -हिंडलगा गावात हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *