Thursday , March 5 2026
Breaking News

शहरातील श्री रेणुका देवी मंदिरासाठी सढळ हस्ते देणगी

Spread the love

 

बेळगाव : जिर्णोद्धार केल्या जात असलेल्या जुन्या पी. बी. रोड येथील श्री रेणुका देवी मंदिराच्या दरवाजासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय कडोलकर यांनी 1.25 लाख रुपयांची देणगी देऊ केली आहे.
जुन्या पी. बी. रोड येथील श्री रेणुका देवी मंदिराचा सध्या जीर्णोद्धार सुरू आहे. त्यासाठी हातभार लावताना मंदिराच्या दरवाजासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय कडोलकर यांनी सढळ हस्ते 1 लाख 25 हजार रुपयांची देणगी देऊ केली.
याप्रसंगी कडोलकर कुटुंबीय व हितचिंतक उपस्थित होते. संजय कडोलकर यांच्या व्यतिरिक्त रघुनंदन कदम यांनी मंदिर जीर्णोद्धारासाठी 50 हजार रुपयाची देणगी दिली. याबद्दल या दोघांचा श्री रेणुका देवी देवस्थानातर्फे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राहुल मुचंडी, चंद्रकांत कामुले, बाळू लोहार, विनोद पुजारी, यल्लाप्पा पाटील आदी उपस्थित होते. जुन्या पी. बी. रोड येथील श्री रेणुका देवी मंदिराचा सध्या मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धार केला जात आहे.
तरी दानशूर व्यक्ती आणि भाविकांनी या जिर्णोद्धार कामास आपल्यापरीने हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *