
बेळगाव : उद्या होणाऱ्या धर्मसभेची तयारी करून आज सायंकाळी हिंडलगा येथील आपल्या घराकडे जात असताना मराठी शाळा हिंडलगा समोर स्पीड ब्रेकरला गाडी स्लो झाल्यानंतर हिंदुत्ववादी नेते हिंदु राष्ट्र सेनेचे नेते आणि श्रीराम सेना जिल्हाध्यक्ष रवी कोकीतकर यांच्यावर दोघा हल्लेखोरांनी गोळीबार केला असून त्या गोळीबारात दोन गोळ्या कोकीतकर यांच्या तोंडाला घासून गेल्याने ते जखमी झाले आहेत. तसेच त्यांच्या ड्रायव्हरच्या मानेला गोळी लागल्याने तेही जखमी झाले आहेत. दोघांनाही केएलई दवाखान्यात दाखल करण्यात आले असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरनी सांगितले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta