Sunday , July 26 2026
Breaking News

कडोलीत उद्या होणार साहित्याचा जागर!

Spread the love

 

बेळगाव : कडोली येथील श्री दुरदुंडेश्वर मठाच्या आवारामध्ये कडोली साहित्य संघातर्फे आयोजित ३८ वे साहित्य संमेलन रविवार दि. ०८/०१/२३ रोजी होणार असुन अध्यक्षस्थानी परभणीचे मा. नितीन सावंत असणार आहेत. तर बेळगाव सीमाभागातील कडोली गावामध्ये प्रथम मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होऊन अत्यंत भव्यदिव्य व यशस्वीरीत्या भरवले जाणार आहे.

संमेलनाचे उद्घाटक म्हणून यल्लोजीराव पाटील उपाध्यक्ष ग्राम पंचायत कंग्राळी बी.के., पॅालीफ्लो व पॅालिहैड्रोन पुरस्कृत स्वामी विवेकानंद नगरीचे उद्घाटक मेकॅनिकल इंजिनिर मा. कुशल कुट्रे राणी चन्नम्मा नगर बेळगाव, सांगाती व्यासपीठाचे उद्घाटक प्रा.एच.के गावडे चेअरमन , सांगाती पतसंस्था, शाखा चंदीगड, ग्रंथ दालनाचे उद्घाटन मोहन पाटील शहापुर बेळगाव, शिवप्रतिमा पुजन निवृत्त कॅप्टन सुनिल पाटील कडोली, सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन गिता सावंत चन्नम्मा नगर बेळगाव, सरस्वती प्रतिमा पूजन नेत्रा मेनसे वडगाव बेळगाव, संत ज्ञानेश्वरी प्रतिमा पुजन रुक्मिणी निलजकर, वैशाली खडीमशीन कंग्राळी खुर्द बेळगाव, महात्मा जोतिबा फुले प्रतिमा पुजन धनश्री होनगेकर कडोली बेळगाव तर ग्रंथदिंडी सकाळी अकरा वाजता सुरु होणार असुन पालखी पुजन ह.भ.प. प्रवीण मायाण्णा, कडोली करणार आहेत.
तर सत्र पहिले सकाळी १०.३०.ते १२.३० वाजेपर्यंत होणार असून उद्घाटन समारंभ व संमेलनाध्यक्ष मा. श्री. नितीन सावंत परभणी यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे.

दुसऱ्या सत्रामध्ये निमंत्रितांचे कविसम्मेलन दुपारी १२.३० ते २-०० या वेळेत, स्नेह भोजन दुपारी २.०० ते २.३० या वेळेत होणार आहे. सत्र तिसरे दुपारी २.३० ते ३.३० “माझा मराठाची बोलू कवतिंके” या विषयावर व्याख्यान होणार आहे.
सत्र चौथे दुपारी ३.३० वा. शिवशाहिर व्यंकटेश देवगेकर यांचा सिंह गर्जतो हा शाहीरी पोवाडा हा कार्यक्रम होणार आहे. कडोली साहित्य संघाचे अध्यक्ष बाबुराव गौंडाडकर यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *