Sunday , February 9 2025
Breaking News

आधी जिंकून तर दाखवा : मंत्री निराणी यांचे आ. बसवनगौडा पाटील यत्नाळ यांना आव्हान

Spread the love

 

विजयपूर : आधी निवडणूक जिंकून तर दाखवा असे जाहीर आव्हान उद्योग मंत्री मुरुगेश निराणी यांनी आज आ. बसवनगौडा पाटील यत्नाळ यांना दिले.
विजयपुरात आज शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री मुरगेश निराणी म्हणाले की, लिंगैक्य सिद्धेश्वर श्रींच्या भूमीत राहून त्यांचा सरळ साधा प्रवचन ऎकुनही त्यांच्यात कोणताही बदल झालेला दिसत नाही. राजकारणात येण्यापूर्वी तुम्ही काय होता हे समजून घ्या आणि आत्मपरीक्षण करा, येणाऱ्या काळात विजयपूरचे मतदार बसवनगौडा पाटील यत्नाळ यांना चांगला धडा शिकवतील, असा इशारा निराणी यांनी दिला.
निराणी बच्चा आहे या यत्नाळ यांच्या विधानावर बोलताना निराणी म्हणाले, तुम्ही फार हुशार आहात ना, मग तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, निराणी हा जगातील पहिल्या क्रमांकाचा निराणी उद्योग समूह बनणारा आहे. मी माझी स्वतः निराणी कंपनी कष्टाने उभारली आहे, हरिहरला जा किंवा स्मशानात जा असे बोलताय, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, भाजपचे अनेक नेत्यांवर नेहमीच टिका करत असतात तुम्ही कोणाला बोलत आहात, कोणत्या पक्षाचे आहात हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. भाजप पक्ष मला आई समान आहे. तुमच्यासारखे सारखे मी बोलत नाही असा टोला त्यांनी हाणला. एवढी ताकद असेल तर तुमची निवडणूक तुम्ही लढवून दाखवा आणि मी माझी लढवून दाखवतो. तुम्ही पोरखेळ चालवलाय का? तुम्ही जिंकून दाखवा, 2023 मध्ये विजयपूरची जनता तुम्हाला धडा शिकवेल. आत्तापर्यंत मी तुम्ही केलेल्या टिकेवर प्रतिउत्तर दिले नाही आपण शांत होतो म्हणजे घाबरलो असे नाही. तुम्ही सुधारेल म्हणून गप्प बसलो होतो, आम्ही याच जिल्ह्यातील आहोत. आम्हालाही तुमच्यासारखे बोलता येते. तसे बोलू नये म्हणून गप्प आहोत हे विसरू नका असा इशारा निराणी यांनी दिला.
बसवनगौडा पाटील यत्नाळ यांच्या भरमसाठ टीकेवर मंत्री निराणी यांनी ‘जोर का झटका, धीरे से लगे’ असा पलटवार केला आहे.
या पत्रकार परिषदेत माजी मंत्री अप्पासाहेब पटृणशेटी, भाजपचे नेते सुरेश बिरादार, चंद्रशेखर कवटगी, भिमाशंकर हदणूर, विवेक डब्बी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बँक फसवणूक प्रकरण; भाजपचे माजी मंत्री कृष्णय्या शेट्टी यांना तीन वर्षांची शिक्षा

Spread the love  बंगळूर : ७.१७ कोटी रुपये बँक फसवणूक प्रकरणात गुरुवारी एका विशेष न्यायालयाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *