
बेळगाव : बेळगावचे श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकीतकर यांच्यावर गोळ्या झाडून फरार झालेल्या तीन आरोपींना पोलिसांनी चोवीस तासांत मोठ्या कारवाईत अटक केली.
बेळगावच्या शहापूर भागातील अभिजीत सोमनाथ भातकांडे वय 41 रा. पाटील मळा बेळगाव यांच्यासह राहुल निंगाणी कोडचवड वय 32 रा. संभाजी गल्ली बस्तवाड, जोतिबा गंगाराम मूतगेकर वय 32 रा. संभाजी गल्ली बस्तवाड हलगा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
रवी आणि अभिजीतमध्ये सुरुवातीपासूनच भांडण झाले होते आणि पैशावरूनही भांडण झाले होते.
त्यामुळे जुन्या वादातून काल रात्री हल्लेखोरांनी रवी यांच्यावर हल्ला केला. बेळगावचे आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली आरोपींना पकडण्यात यश आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta