बेळगाव : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले छत्रपती संभाजी राजांच्या मूर्तीचे काम अनेक दिवसापासून चालले आहे. त्याची शुक्रवारी सायंकाळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण गावडे व मराठा समाजाचे नेते किरण जाधव आणि शिवसेना उपजिल्हाध्यक्ष बंडू केरवाडकर यांनी कामाची पाहणी करून लवकरात लवकर काम पूर्ण करून लोकार्पण करण्यात यावे, असे आवाहन छत्रपती संभाजी राजे सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांना करण्यात आले.
यावेळी उपस्थितीत सुशोभिकरण समितीचे सरचिटणीस प्रसाद मोरे, उपाध्यक्ष आदित्य पाटील, श्रीनाथ पवार, मनोज काकतकर, अजिंक्य पवार, ओमकार पुजारी, गिरीश पाटील, वैभव धामणकर, उदित रेगे यासह अन्य समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta