बेळगाव : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारा ‘सार्वजनिक वाचनालय बेळगाव पत्रकार पुरस्कार २०२२’ करिता मराठी विभागासाठी अण्णाप्पा पाटील (वार्ताहर, दैनिक तरुण भारत बेळगाव) आणि कन्नड विभागासाठी एम. एन. पाटील (मुख्य वार्ताहर, दैनिक लोकदर्शन बेळगाव) यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच प्रा. एस. आर. जोग महिला पत्रकार पुरस्कार २०२२ याकरिता मराठी विभागासाठी क्रांती हुद्दार (संपादिका, दैनिक बेळगाव वार्ता) आणि कन्नड विभागासाठी मंजुळा पाटील (संपादिका, दैनिक संध्यासमय बेळगाव) यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख रक्कम मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सदर पत्रकार पुरस्कार बुधवार दिनांक १८ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मराठा मंदिर सभागृह खानापूर रोड, गोवावेस येथे बॅ. नाथ पै व्याख्यानमालेच्या उद्घाटन सोहळ्यात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.