बेळगाव : हालगा येथील आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित शारदा हायस्कूलमध्ये 39 व्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ झाला. संस्थेचे चेअरमन श्री. विजय अर्जुन लोहार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाला सुरुवात झाली. इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. वडगाव येथील मंगाई सौहार्द सोसायटी नियमितचे चेअरमन श्री. सतीश शिवाजी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी या क्रीडा स्पर्धांना भरघोस देणगी दिली आणि क्रीडा स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राहुल रामा बिळगोजी, सेक्रेटरी श्री. बळीराम सुरेश बिळगोजी, संचालक सदस्य श्री. प्रवीण तुकाराम सामजी, श्री. भिमराव पिराजी सामजी, तसेच विश्वस्त कमिटीचे श्री. ए. एम. लोहार, श्री. एस. डी. बिळगोजी, श्री. तुकाराम सामजी, शारदा हायस्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
सहशिक्षक श्री. एच. के. बिळगोजी यांनी सूत्रसंचालन केले. कुमारी श्रेया कामाणाचे व क्रीडाशिक्षक राजू शंकर पाटील यांनी क्रीडा शपथ देवविली. हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. व्ही. आर. घाडी यांनी पाहुण्यांचे स्वागत व आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली.
या क्रीडा स्पर्धांना प्रमुख पाहुणे श्री. सतीश शिवाजी पाटील यांनी रोख देणगी दिली तसेच श्री. सचिन आपय्या बिळगोजी बिल्डींग कॉन्ट्रॅक्टर हलगा व श्री. सदानंद मोनाप्पा बिळगोजी व्यवस्थापक गणेश दूध संचलन केंद्र हलगा यांनी क्रीडा स्पर्धकांना बक्षीस जाहीर केले.