Thursday , March 5 2026
Breaking News

बाकमुर रस्ता तात्काळ दुरुस्त करा; बाकमुर ग्रामस्थांचे निवेदन

Spread the love

 

बेळगाव : बाकमुर रस्ता तात्काळ दुरुस्त करून बस सेवा पूर्ववत व सुरळीत करावी, अशी मागणी बाकमुर परिसरातील ग्रामस्थ व नागरिकांनी निवेदनाद्वारे केली.

बेळगाव जवळील बाकमुर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. दुचाकीस्वार जीव मुठीत घेऊन या रस्त्याने ये-जा करताना दिसत आहेत.
बाकमुर रस्ता खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या गावची बस सेवा देखील कोलमडली आहे. दैनंदिन व्यवहारासाठी बाकमुर येथील नागरिकांना बेळगावला यावे लागते. मात्र खराब रस्त्यामुळे बस सेवा बंद करण्यात आली आहे./त्यामुळे नागरिकांना स्वतःच्या दुचाकीवरून प्रवास करून बेळगाव गाठावे लागत आहे. खराब रस्त्यामुळे वारंवार लहान मोठे अपघात घडत आहे. त्यामुळे वाहनचालकांना या रस्त्यावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी देखील बस सेवा कोलमडल्यामुळे पायी प्रवास करून बेळगाव गाठत आहेत. त्यामुळे विद्यार्थीवर्गाचे शैक्षणिक नुकसान होत आहे. परीक्षा जवळ आल्या आहेत. मुलांना शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी बस सेवा सुरळीत चालू करावी व बाकमुर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ व विद्यार्थी करत आहेत.
यावेळी तालुका म. ए. समितीचे नेते माजी आमदार मनोहर किणेकर, युवा नेते आर. एम. चौगुले, माजी महापौर शिवाजी सुंठकर, ऍड. सुधीर चव्हाण, एम. जी. पाटील, बेळवट्टी ग्राम पंचायत अध्यक्ष म्हाळू मजूकर, नारायण गोडसे, विठ्ठल मजुकर, विठ्ठल गोडसे, नाना मजुकर, रवळु गोडसे, शंकर गोडसे, राघोबा मजुकर तसेच विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *