Thursday , March 5 2026
Breaking News

येळ्ळूरमध्ये छत्रपतींच्या नव्या मूर्तीची होणार प्रतिष्ठापना!

Spread the love

 

बेळगाव : येळ्ळूर गावातील पाटील गल्ली येथील शिवाजी महाराजांची मूर्ती जीर्ण झाल्याने त्या जागी नवीन अश्वारूढ मूर्ती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती शिवानंद मठपती यांनी दिली.
बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावातील पाटील वाडीमध्ये प्रतिष्ठापना करण्यात येणार्‍या छत्रपती शिवरायांच्या नव्या अश्वारूढ मूर्तीची शहरातील शिवाजी उद्यानापासून मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी माहिती देताना शिवानंद मठपती म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची जुनी मूर्ती जीर्ण झाल्याने त्या जागी दुसरी नवीन मूर्ती बसवण्याचा निर्णय गल्लीतील तरुण मंडळींनी घेतला. कोल्हापूर येथून छत्रपती शिवरायांची अश्वारूढ मूर्ती आणण्यात आली असून शिवाजी उद्यानापासून आम्ही ती मिरवणुकीने येळ्ळूरला नेत आहोत. या मिरवणुकीत भजनी मंडळ, गोंधळी मंडळ, ढोल पथक, इतर ग्राम पंचायतीचे सदस्य सहभागी झाले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *