बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या ग्रंथालयासाठी येळ्ळूर गावातील तरुण श्री. चेतन कल्लाप्पा हुंदरे, श्री.विक्रम परशराम कुंडेकर आणि कु.महेश प्रकाश पाटील यांच्याकडून पुस्तके भेट देण्यात आली.
या मध्ये स्पर्धात्मक परीक्षेसाठी लागणारी तयारी, इंग्रजी स्पीकिंग, शेअर मार्केट, आर्थिक, अध्यात्मिक आणि देशातील महान कॉर्पोरेट गुरुंबद्दल माहिती देणाऱ्या पुस्तकांचा समावेश आहे. यावेळी येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष श्री. सतिश बाळकृष्ण पाटील, सदस्य श्री. शिवाजी नांदुरकर, श्री. प्रमोद पाटील, श्री. राकेश परीट, श्री. परशराम परीट, कु. दयानंद उघाडे, श्री. कल्लाप्पा मेलगे, श्री. सुनील अरळीकट्टी व ग्रंथालयाचे कर्मचारी कल्मेश कोकणे आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta