बेळगाव : ब्रह्मलिंग स्पोर्ट्स बेनकनहळ्ळी यांच्या वतीने आयोजित ओपन खो- खो स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आर. एम. चौगुले आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडूस्कर यांनी केले.
यावेळी आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष चेतन पाटील, श्रीराम सेना हिंदुस्थानचे तालुकाप्रमुख भरत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
खेळाडूंच्या जर्सीचे अनावरण

दरम्यान, सुळगा गावची खो-खो टीम राज्य पातळीवर खेळणार आहे व त्या खेळाडूंना युवा नेते आर. एम. चौगुले यांनी जर्सी वाटप केली. यावेळी आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष चेतन पाटील, सुनील आवडन, राज सांगावकर व खोखो प्रेमी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta