बैलहोंगल तालुक्याच्या शिगीहळ्ळी (केएस) गावातील घटना
बैलहोंगल : ऊसाने भरलेला ट्रॅक्टर घरावर कलंडल्याने झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना शिगीहळ्ळी (ता. बैलहोंगल) येथे आज रविवारी दुपारच्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, ऊस भरून मरीकट्टी गावातून कारखान्याकडे जात असताना शिगीहळ्ळी गावानजीकच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर अजप्पा बडीगेर यांच्या घरावर उलटला, या अपघातात पुलारकोप्प गावातील एक वृद्ध महिला जागीच ठार झाली. तर अन्य पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच शिगीहळ्ळी व मरीकट्टी ग्रामस्थांनी घटनास्थळी गाव घेतली व स्थानिकांच्या मदतीने जखमींना हिरेबागेवाडी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेत घराच्या छताला अडकून ६ मेंढ्यांचाही मृत्यू झाला आहे. अपघातानंतर गावातील मंजू कुरी, विठ्ठल तळवार यांच्यासह ग्रामस्थांनी बचाव कार्य सुरू केले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच बैलहोंगल पोलीस स्थानकाचे निरीक्षक पी. व्ही. सालीमठ यांनी सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत पाहणी केली. या घटनेची नोंद बैलहोंगल पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta