बेळगाव : येळ्ळूर येथील श्री ब्रह्मलिंग मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी शांताई वृद्धाश्रमास नुकतीच भेट दिली. शांताई वृद्धाश्रमाचे सदस्य ऍलन विजय मोरे यांनी सर्व सदस्यांचे स्वागत केले व आश्रमाच्या प्रगतीविषयी सांगितले. ब्रह्मलिंग सोसायटीचे संस्थापक श्री. गोविंद कालसेकर तसेच सर्व सदस्यांनी आश्रमाच्या प्रगती विषयी समाधान व्यक्त केले. सोसायटीच्यावतीने वृद्धाश्रमास आवश्यक विविध प्रकारच्या डाळी, तेल, गहूपीठ, साखर, चहा पावडर, मूग, पोहे, रवा इ. आहार पदार्थ ऍलन विजय मोरे यांचेकडे सुपुर्द करण्यात आले. व यापुढेही संस्थेला मदत करण्यासाचे आश्वासन दिले.
प्रसंगी ब्रह्मलिंग सोसायटीचे संस्थापक श्री. गोविंद कालसेकर, चेअरमन श्री. जोतिबा गोविंद कालसेकर, व्हा. चेअरमन श्री. प्रकाश सायनेकर, संचालक बाळासाहेब पावले, नेताजी गोरल, संजय हूव्वाणावर, बाळासाहेब कंग्राळकर, संजय मासेकर, पुंडलिक कंग्राळकर, विष्णु मासेकर, क्लार्क श्री. भुजंग कुंडेकर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta