बेळगाव : बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना, राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारतीय निवडणूक आयोगातर्फे देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट “जिल्हा निवडणूक अधिकारी” पुरस्कार जाहीर झाला आहे.
भारतीय निवडणूक आयोग आणि कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने हा पुरस्कार जाहीर केला आहे.
बुधवार दिनांक 25 जानेवारी दुपारी 1 वाजता बेंगगळुरच्या सर पुत्तन्ना चेट्टी टाऊन हॉल येथे आयोजित “राष्ट्रीय मतदार दिन” कार्यक्रमात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यावेळी कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोजकुमार मीना आणि बीबीएमपीचे मुख्य आयुक्त तुषार गिरीनाथ उपस्थित राहणार आहेत.
मतदार नोंदणी आणि पुनर्निरिक्षण यासह एकूणच निवडणुकीतील नितेश पाटील यांची सर्वोत्तम कामगिरी लक्षात घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta