बेळगाव : शुक्रवार दि. 20 जानेवारी रोजी मजगांव येथील 35 नं. प्राथमिक मराठी शाळेत महिलांचा स्नेहमेळावा तथा हळदीकुंकु कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
शाळेच्या सहशिक्षीका नुतन कडलीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपस्थित महिलांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन करुन दीप प्रज्वलन करण्यात आले.
आदर्श शिक्षीका पुरस्कारप्राप्त सविता चंदगडकर, रेखा चव्हाण, शाहीन रसुलखान तसेच शिक्षणप्रेमी मंगल शेटवाळ, क्रिडा स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेते शिक्षक सुभाष भातखांडे आदिंचा सत्कार करण्यात आला.
नगरसेविका सौ. प्रिया सातगौडा, मनिषा पाटील, जयश्री पाटील, डॉ. तेजस्वी अनगोळकर यांनी मार्गदर्शन केले. मुख्याद्यापक श्री. आर. के. उत्तुरकर यांनीही महिला सशक्तीकरण याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला एसडीएमसी सदस्या, अंगणवाडी शिक्षिका, स्त्रीशक्ती संघाच्या सदस्या आदि उपस्थित होत्या.
सुवर्णा केसरकर यांनी गित सादर करुन वाहवा मिळवली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष हिरामणी अनगोळकर व सर्व समितीचे सहकार्य लाभले.
सुत्रसंचालन वंदना गावडे यांनी केले.
रेणुका पिंगट यानी आभार मानले .
Belgaum Varta Belgaum Varta