बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातील संभाजी महाराजांच्या स्मारकाचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आले असून येत्या शनिवारी (28 जानेवारी) स्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या पुढाकारातून व मार्गदर्शनाखाली स्मारकाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. शनिवार सकाळी 5 ते दुपारी 1 पर्यंत राज्याभिषेक व होमहवन करण्यात येणार असून सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत सुशोभीत करण्यात आलेल्या चौकाचे आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून ग्वाल्हेर सरदार घराण्याचे वंशज व भारताचे सेंट्रल इन्फॉमेशन कमिशनर उदय माहूरकर उपस्थित राहणार आहेत. ते ज्येष्ठ इतिहासकार असून शिवाजी महाराजांच्यावर त्यांचा मोठा अभ्यास आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांवर त्यांचा पुस्तक लिहिण्याचा मानस आहे. गेली दीड वर्षे स्मारकाच्या सुशोभीकरणाचे काम सुरु होते. बेळगावच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या या छ. संभाजी महाराज स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात संपूर्ण बेळगावकरांनी व तरुणांनी ढोल पथकासह सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार अनिल बेनके यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta