बेळगाव : सालाबाद प्रमाणे 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन सकाळी 8 वाजता श्री संत नामदेव मंदिरमध्ये साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्री. नारायणराव काकडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले आहे. ध्वजवंदनानंतर समाजातील प्रतिष्ठित, S K टेलर्स चे मालक श्री. सचिन काकडे यांनी 60 फुट उंच मोदी कोट शिवून जागतिक रेकॅार्ड वर्ड गिनीज बुक मध्ये नोंद झाल्याबद्दल यांचा समाजाच्या वतिने श्री. रोहण उरणकर आणि श्री. अशोक रेळेकर यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यार आला. तसेच सामाजिक एकोप्याची बिज समाजात रूजण्यासाठी समाज बाधंवाच्या वतिने श्री संत नामदेव मंदिर खडे बाजार येथुन शहरातील प्रमुख बाजार पेठ गणपत गल्ली, मारूती गल्ली, किर्लोस्कर रोड, धर्मवीर संभाजी महाराज चौकातून कॅालेज रोड, राणी चन्नमा सर्कलमार्गे काकवेस परत श्री संत नामदेव मंदिर पर्यंत तिरंगा यात्रा (बाईक रॅली) काढण्यात आली. संस्थेच्या वतीने श्री. अजित कोकणे यांनी सर्वाचे आभार मानत या पुढेही असेच मंदिराच्या कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे आवहान समाजास केले कार्यक्रमास श्री नामदेव दैवकी संस्थेचे संचालक, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मंडळ आणि बहुसंख्य समाज बांधव भगिनी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta