बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या दोन स्केटर्सनी सीबीएसई राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये अभिनंदनीय यश मिळविले आहे.
गुरुग्राम, हरियाणा येथे जानेवारी 2023 मध्ये झालेल्या सीबीएसई राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप या स्पर्धमध्ये संपूर्ण भारतातून 1200 हून अधिक स्केटिंगपटूंनी भाग घेतला होता. त्यात बेळगावच्या स्केटर्सनी 1 रौप्य आणि 2 कांस्य पदके अशी एकूण 3 पदके जिंकली. स्पीड स्केटिंग शर्यतीत आर्य कदम याने 1 रौप्य पदक, तर अवनीश कामन्नवर यांने 2 कांस्य पदक पटकाविली. हे दोघे स्केटर्स स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा आणि विशाल वेसणे यांच्या मार्गदर्शनाखाली केएलई स्केटिंग रिंक आणि गुड शेफर्ड स्केटिंग रिंक येथे सराव करत असून त्यांना शाम घाटगे, राज घाटगे, प्रेरणा घाटगे, गूड शेफर्ड सेंट्रल स्कूलचे मुख्याध्यापिका सरला कोसराजू, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर व केआरएसए सरचिटणीस इंदुधर सीताराम यांचे प्रोत्साहन लाभत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta