बेळगाव : कापसाची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनाला आग लागून कापूस आणि वाहन जळून भस्मसात झाले.
सोमवारी रात्री बेळगाव गोकाक मार्गावर ही दुर्घटना घडली. कापसाची वाहतूक करणारे वाहन गोकाककडे निघाले होते. बडाल अंकलगी गावाजवळ ही दुर्घटना घडली. वाहनात कापूस क्षमतेपेक्षा अधिक भरण्यात आला होता. त्यामुळे कापसाच्या गट्ठयांचा विद्युत तारेला स्पर्श होऊन आग लागली. रात्रीची वेळ असल्याने आग विझवणे शक्य झाले नाही. वाहनात कापूस असल्याने क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. गोकाक येथील अग्निशामक दलाला कळविण्यात आले पण अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होई पर्यंत वाहन आणि कापूस जळून भस्मसात झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta