
बेळगाव : महाराष्ट्रात जरी शिवसेनेत दोन गट झाले तरी देखील सीमाभागात ठाकरे गटाकडे जोर कायम राहिलेला आहे. आज ठाकरे गटात सीमाभागातील विशेष करून तालुका प्रमुख सचिन गोरले यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्राणीणमधून अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश झाला. आज टिळक चौक येथील येथे आयोजित उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर
उपतालुका प्रमुख पिराजी शिंदे, उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, चंद्रकांत कोंडूस्कर, युवासेना प्रमुख विनायक हुलजी, आकाश डुकरे यांच्या उपस्थितीत बेळगाव शहर आणि तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
तालुका प्रमुख सचिन गोरले व उप शहर प्रमुख राजू तुडयेकर यांनी नवीन कार्यकर्त्यांना पक्षात आणण्यासाठी पुढाकार घेतला होता.
शिवबंधन म्हणजे हा एक धाका नसून राजा शिवछत्रपती एक रक्षक कड आहे. मा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कठोर परिश्रमाद्वारे या भगव्या झेंड्याचे व हिंदू धर्माच्या रक्षणासाठी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून केले. बाळासाहेब ठाकरे प्रत्येक गोष्ट शिवछत्रपती महाराज यांच्या शिवचरीत्र तातोतंत पालन करत समाज्याचे कार्य केले आहे. तसेच युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे शौर्य अंगी विचारांना देत आपले कार्य केले पाहिजे. बाळासाहेब यांनी महाराष्ट्र जशी संघटना मजबूत केली तसेच कार्य सीमाभागातील नवीन कार्यकर्त्यांनी हाती घेतले पाहिजे केले पाहिजे, असे मत साहित्यिक गुणवंत पाटील यांनी व्यक्त केले.
तालुका प्रमुख सचिन गोरले म्हणाले, शिवसेना आता जोमाने कार्य हाती घेणार आहे. प्रत्येक गावागावात आपली संघटना पोहचली पाहिजे. आपल्या प्रदेशात शिवसेना मजबूत करण्याबरोबरच मराठी भाषेच्या रक्षणाचे कार्य केले पाहिजे. येणाऱ्या काळात शिवसेना सामाजिक कार्याबरोबर राजकारणातही उतरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
Belgaum Varta Belgaum Varta