Thursday , March 5 2026
Breaking News

“चलो मुंबई”च्या पार्श्वभूमीवर नावे नोंदणीसाठी समितीच्या वतीने आवाहन!

Spread the love

 

बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने मंगळवार दि. 28 फेब्रुवारीला मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलनासाठी “चलो मुंबई”चा नारा दिला आहे. या धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी बेळगाव तालुक्यातील म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी, मराठी भाषिकांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ज्यांना सहभागी व्हायचे असेल, त्यांनी आपली नांवे बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कॉलेज रोड येथील (पवन हॉटेलच्या बाजूला) शिंदे बिल्डिंग कार्यालयात नोंदवावीत. ज्या कार्यकर्त्यांना रेल्वेने जाण्याचे नियोजन करण्यात आले असून यासाठी प्रत्येकी 700 रुपये व एक स्वतःचे आधार कार्ड झेरॉक्स देण्याचे आहे. तसेच ज्या कार्यकर्त्याना आपल्या स्वतःच्या वैयक्तिक वाहनातून जायचं असेल त्यांनीही आपली नावे व वाहन क्रमांक या कार्यालयात देण्याचे ठरविण्यात आले आहे. ही नावे नोंद करण्यासाठी तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस ऍड. एम. जी. पाटील 9448437141, दीपक पावशे 6363167121, युवा आघाडीचे चिटणीस मनोहर संताजी 7847886025, हे गुरुवार दिनांक 2 ते शुक्रवार दिनांक 10 पर्यंत दुपारी 12 ते 3 पर्यंत कार्यालयात हजर असतील. सदर त्यांच्याकडे नांवे नोंदवावी, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी केले आहे.

शहर समितीचे आवाहन
या मोर्चात सहभागी होण्यासाठी रेल्वे, बस किंवा खाजगी वाहनांने येणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपली नावे दि. 10 तारखेपर्यंत नोंदवावीत.
रेल्वेसाठी 700 रूपये (आधार कार्ड आवश्यक), बससाठी 1100 रूपये भरावे लागतील. शुक्रवार दि. 3 पासून दि. 10 तारखेपर्यंत सायंकाळी 6 ते 7 या वेळेत तर खाजगी वाहनांने येणाऱ्यांनी दि. 15 पर्यंत रामलिंगखिंड गल्ली येथील शहर म. ए. समितीच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन शिवराज पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *