बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतच्या वतीने राष्ट्रीय रोजगार दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी येळ्ळूर येथील फुटूक तलाव याठिकाणी महिला व पुरुष रोजगारांना येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते आइस्क्रीम व चॉकलेट देऊन रोजगार दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील म्हणाले की, येळ्ळूर व अवचारहट्टी येथे जास्तीत जास्त बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत रोजगार कार्ड मिळवून देऊन, त्या रोजगारांना जास्तीत जास्त दिवस रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करणार असून यातून गावाचा विकास तसेच गावातील बेरोजगारांची आर्थिक परिस्थिती व गावाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्नशील राहीन. तसेच गावातील तलाव, नाले, पाठ खुदाई रोजगार कामाच्या माध्यमातून करून घेणार आहे. यातून गावाचा विकास साधता येईल, असे अध्यक्ष सतीश पाटील यांनी बोलताना बोलताना सांगितले.
यावेळी ग्राम पंचायत कर्मचारी, रोजगार गट प्रमुख, तसेच 150 रोजगार महिला व पुरुष उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta