येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने प्रतिवर्षी कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते, यावर्षीचे 18 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवार( ता.19) फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी साहित्य संघाच्या वतीने शुक्रवार (ता. 10) रोजी सकाळी 11-00 वाजता श्री शिवाजी विद्यालय येळ्ळूर या ठिकाणी कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, सदर कथाकथन स्पर्धा कै. सुमित्रा यल्लोजीराव मेणसे यांच्या स्मरणार्थ घेण्यात येत असतात, प्रा. यल्लोजीराव निंगोजीराव मेणसे यांच्याकडून या कथाकथन स्पर्धेसाठी प्रतिवर्षी बक्षिसे दिली जातात. कथाकथन स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार आहे, पहिला गट- माध्यमिक गट यासाठी वेळ पाच मिनिटे असणार आहे, तर दसरा गट- खुला गट यासाठी वेळ सात मिनिटे असणार आहे, दोन्ही गटासाठी विषय बंधनकारक राहणार नाही, स्पर्धकांने कोणतीही कथा सादर करावयाची आहे. माध्यमिक गटासाठी पहिले बक्षीस 1000, दुसरे 500 व तिसरे 250. खुल्या गटासाठी – पहिले बक्षीस 1500, दुसरे 1000 व तिसरे 750 अशी बक्षिसे असणार आहेत. प्रथम क्रमांक मिळवलेल्या दोन्ही स्पर्धकांना संमेलनामध्ये आपली कथा सादर करण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta